Name of Book : चंद्रकोर

Name of Author : जयश्री पाठक

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 95

Synopsis :
’चंद्रकोर" हा जयश्री पाठक या नवोदित कवयित्रीचा पहिलावहिला कवितासंग्रह आहे. पण कवयित्री नवोदित असली तरी प्रस्तुत संग्रहातल्या चौसष्ठ-पासष्ठ कवितांमध्ये नवशिकेपणाच्या खुणा अगदी क्वचितच आढळतात, ही गोष्ट मुद्दाम नमूद करावीशी वाटते. संग्रहाबाबतची आणखी एक उल्लेखनीय गोष्ट ही की, नव्याने कविता लिहू लागलेल्या कवीकवयित्रींच्या प्रारंभींच्या रचनांमध्ये अनेकदा जो भाबडा उत्साह, उतू जाणारी हौस, आपण कविता लिहितो याचेच एक कौतुक आणि त्यातून निर्माण होणारी आत्मपौढी यांचा आढळ होतो त्याचेही दर्शन जयश्रीच्या कवितांमध्ये होत नाही. कवितेकडे ती घडीभराची करमणूक करणारा छंद म्हणून पाहात नाही तर कवितेतून जाणिवांच्या काही अज्ञात कक्षांचा शोध घ्यावा, आपली म्हणून एक जीवनदृष्टी व्यक्त करावी आणि त्यातून आत्मप्रकटीकरणाचा आनंद अनुभवावा ही तिची कवितानिर्मितीमागची भूमिका आहे.