Name of Book : मुजोर

Name of Author : अनंत मनोहर

Reading Cost : $0.5/ Rs.20 / Free

No. Of Pages : 162

Synopsis :
इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी रोज वाढते आहे. इंटरनेटचे महाजाल पसरते आहे. ई मेल, मोबाईल, इंटरनेटमुळे जग खूप जवळ येते आहे. म्हणून ते लहानही होत आहे. इतके की देश-राष्ट्र-प्रांत-राज्य-प्रदेश-गाव-वाड्या-वस्त्या-वंश-कुल-घराणे-वर्ण-जात-पोटजात-नागर-अनागर वगैरेंमधील वैशिष्ट्यें, वैविध्ये, व्यवच्छेदकता या पुढच्या काळात फारशी उरणार नाहीत. ग्लोबल व्हिलेज ही केवळ संकल्पना म्हणून राहणार नाही. ते वास्तव ठरेल. म्हणजे प्रादेशिकतेचा लोप होईल. संस्कृती एकारलेली नसेल. त्याचा एक परिणाम म्हणजे साहित्यात व्यामिश्रता येत जाईल. नवी प्रमेये, नव्या स्थितिगती यांना सामोरे जावे लागेल. कथा"आ बोय मीत्स अ गिर्ल" अशी साधी, सरळ, सरधोपट राहाणार नाही, राहून चालणार नाही. या संग्रहातील कथा या जाणीवेशी जवळीक साधणाऱ्या आहेत. हे त्यांचे एक ठळक वैशिष्ट्य आहे.