Name of Book : जिगलो ते ऑस्कर हिरो

Name of Author : सुहास टिल्लू

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 288

Synopsis :
’जिगलो ते ऑस्कर हिरो’ ही मन्मथ गोखले या मराठी माण्साने घेतलेली प्रचंड झेप. ही झेप त्याने दुर्दम्य इच्छाशक्तिच्या बळावर घेतलेली आहे आणि ही झेप घेताना आपण एक संस्कारक्षम मराठी माणूस आहोत आणि जन्माने निर्माण झालेल्या नात्यानं आपण घट्ट बांधले गेलो आहोत, याचा त्याला कधीही विसर पडलेला नाही. डेझाचा पत्नी म्हणून स्वीकार करताना त्याला ज्या दिव्यातून जावं लागलं ते लक्षात घेतलं तर माणूस म्हणून तो मेला होता, याची सहज प्रचीती येते. ही कादंबरी म्हणजे पुरुषवेश्या व्यवसाय या किळसवाण्या प्रकाराबद्दलची आपली प्रतिक्रिया असल्याचे या कादंबरीचे लेखक सुहास टिल्लू यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे. एखाद्या किळसवाण्या प्रकाराबद्दलची प्रतिक्रिया नितांत सुंदरदेखील असू शकते हे कादंबरी वाचल्यानंतर कळते.