Name of Book : सौंदर्य सम्राज्ञी

Name of Author : गुरुनाथ नाईक

Reading Cost : $0.5/ Rs.25 / Free

No. Of Pages : 238

Synopsis :
ऎटबाज घोड्यावर रेखीव बांध्याची सुंदर तरुणी बसली आणि दौडत निघाली तर....... राव, कितीही स्त्रिद्वेष्टे असा, मान मोडेपर्यंत वळून वळून पाहाल तिच्याकडे. वेळ दुपारची होती. ऊन रखरखलेले होते. भाजून काढीत होते सर्वांगाला ..... जमीनही तापली होती. आणि त्याच वेळी चौरंगी गावाच्या पश्चिमेला साधारण नऊ मैलांवर असलेल्या एका शेतवाडीत तीन घोडेस्वार शिरले. ते पश्चिमेकडून नदी पार करुन आले होते.