Name of Book : रानफुलं

Name of Author : जगदीश अभ्यंकर

Reading Cost : $0.5/ Rs.10 / Free

No. Of Pages : 64

Synopsis :
फुलली. फुलं कुणाला आवडत नाहीत? ज्याला फुलं आवडत नाही त्याला या दुनियेत दुसरं काहीच आवडत नसेल! आणि ज्याला कुणाला फुलंच आवडत नसतील तर त्यानं जगायचं तरी कशाला आणि कोणासाठी? फुलं आपणाला आवडतात. माणसागणिक फुलांच्या आवडी-निवडीत फरक असतो. एखाद्याला गुलाबाची फुलं सर्वाधिक आवडतात. तर दुसऱ्याला जाई-जुईची फुलं! कुणी मोगऱ्याची फुलं पाहून मोहीत होतो. झेंडूची, जास्वंदाची फुलं आवडणारीही बरीच मंडळी असतात. चाफ्याच्या फुलांचा गुच्छ वारंवार हुंगणारेही रसिक आहेत. थोडक्यात फुलांच्या अस्तित्वामुळे वसुंधरेची शोभा वाढलीय अन्‌ माणसाच्या जीवनालाही अर्थ लाभलाय! फुलांमुळे मानवाची रसिकता फुलली.